बहे येथे ८० जणांची नेत्रतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:40 IST2020-12-16T04:40:28+5:302020-12-16T04:40:28+5:30

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष, राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त बहे (ता. वाळवा) येथील ...

Eye examination of 80 people at Bahe | बहे येथे ८० जणांची नेत्रतपासणी

बहे येथे ८० जणांची नेत्रतपासणी

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष, राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त बहे (ता. वाळवा) येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात आयोजित मोफत डोळे तपासणी शिबिरात बहे, हुबालवाडी व खरातवाडी येथील ८० जणांची नेत्रतपासणी करण्यात आली.

इफिगो, आय केअर सेंटर सांगली व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष विजय हुबाले यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सांगली जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत.

यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलतात्या पाटील, माणिकदादा पाटील, अनिल खरात, वैशाली पाटील, हुबालवाडीचे सरपंच चांगदेव कांबळे, प्रा. शशिकांत पाटील, शशिकांत दगडे, लखन पवार उपस्थित होते. ग्रा.पं. सदस्य जयकर पवार यांनी आभार मानले.

फोटो : १५१२२०२०-आयएसएलएम-बहे न्यूज

ओळ :

बहे (ता. वाळवा) येथे आयोजित मोफत डोळे तपासणी शिबिरात विजयराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, विजय हुबाले, माणिक पाटील, विठ्ठल पाटील, चांगदेव कांबळे उपस्थित होते.

Web Title: Eye examination of 80 people at Bahe