खेळाडूंना शासकीय नाेकऱ्या देण्यासाठी व्यापक माेहीम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:57+5:302021-02-08T04:23:57+5:30
हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शंतनू सगरे मित्र परिवाराने राज्यस्तरीय पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केल्या ...

खेळाडूंना शासकीय नाेकऱ्या देण्यासाठी व्यापक माेहीम राबविणार
हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शंतनू सगरे मित्र परिवाराने राज्यस्तरीय पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यावेळी प्रतीक पाटील बोलत होते. यावेळी युवा नेते रोहित पाटील, शंतून सगरे उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले, तालुक्यातील तरुणांनी राजकारणाबरोबर स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. कोणतीही अडचण असल्यास कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेला आपले दरवाजे कायम उघडे आहेत.
यावेळी युवा नेते रोहित पाटील, शंतनू सगरे यांनीही मनाेगत व्यक्त केले. यावेळी सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रतीक पाटील यांची निवड झाल्याबद्दल शंतनू सगरे मित्रमंडळातर्फे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या पासिंग बॉल स्पर्धेत शंतनू सगरे मित्रमंडळ संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्या संघाला प्रा. प्रकाश घड्याळे चषक देऊन गाैरविण्यात आले. स्पर्धेत पुणे संघाने दुसरा, इस्लामपूर संघाने तिसरा, तर लातूर संघाने चौथा क्रमांक पटकवला. स्पर्धेत मुंबई, पुणे, लातूरसह १६ संघांनी सहभाग नोंदवला.
यावेळी राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब पाटील, दत्ताजीराव पाटील, टी. व्ही. पाटील, मोहन खोत, एम. के. पाटील, उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संजय हजारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अमित शिंत्रे, प्रवीण कुनुरे, सौरव पाटील, अनिकेत इरळे, अवी लोंढे यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयाेजन केले.
फाेटाे : ०७ केएम १