शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:17+5:302021-07-04T04:18:17+5:30

सांगली : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर ...

Extension till 15th July for filling up application for scholarship | शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

सांगली : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याकामी दि. १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संभाजी पोवार यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, सर्व पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, निर्वाह भत्ता या योजनांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून महाडीबीटीमहाईट या संकेत स्थळावर अर्ज भरावेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर, नोटीस बोर्डवर पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज रजिस्टेशन करून घेण्याबाबत सूचना कराव्यात. याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोवार यांनी केले आहे.

Web Title: Extension till 15th July for filling up application for scholarship