जीएसटीच्या तिमाही विवरणपत्रांसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:11+5:302021-06-20T04:19:11+5:30

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विविध अधिसूचनांद्वारे सवलती घोषित केल्या आहेत. व्याज दर व विलंब शुल्कात सवलतींसह विवरणपत्राला ...

Extension for GST quarterly returns | जीएसटीच्या तिमाही विवरणपत्रांसाठी मुदतवाढ

जीएसटीच्या तिमाही विवरणपत्रांसाठी मुदतवाढ

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विविध अधिसूचनांद्वारे सवलती घोषित केल्या आहेत. व्याज दर व विलंब शुल्कात सवलतींसह विवरणपत्राला मुदतवाढ दिली आहे. तिमाही विवरणपत्र योजनेखालील करदात्यांसाठी २१ जूनपर्यंत मुदत दिली आहे.

जुलै २०१७ ते एप्रिल २०२१ या काळातील जीएसटी रिटर्न - ३ बी प्रलंबित असतील तर त्यासाठी जीएसटी विवरणपत्र अभय योजना ३१ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. त्याचा फायदा करदात्यांनी घ्यावा, असे आवाहन केंद्रीय जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त के. राजकुमार व राज्य जीएसटी विभागाच्या उपायुक्त (प्रशासन) शर्मिला मिस्कीन यांनी केले आहे.

मे २०२१च्या जीएसटीआर - १ ची वाढीव मुदत २६ जून तर आयएफएफ परिपत्राची वाढीव मुदत २८ जूनपर्यंत आहे. जीएसटी विवरणपत्राबाबत अभय योजना तसेच अशा इतर सवलतींसाठी जीएसटी विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा मिरजेतील केंद्रीय जीएसटीचे अधीक्षक मकरंद कुलकर्णी, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर किंवा सांगलीतील चिंतामणी नगर येथील राज्य कर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Extension for GST quarterly returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.