शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:31 IST2021-08-24T04:31:40+5:302021-08-24T04:31:40+5:30
सांगली : केंद्र सरकारच्यावतीने अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कसाठी अर्ज ...

शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
सांगली : केंद्र सरकारच्यावतीने अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे, तरी अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
---------
स्वयंरोजगार इच्छुकांसाठी गुरुवारी सेमिनार
सांगली : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी गुरुवार, दि. २६ रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली.
----------
माजी सैनिक पाल्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज
सांगली : या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणासह उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात शिकत असलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त) यांनी केले आहे.
-------
सांगलीत २८ सप्टेंबरला डाक अदालत
सांगली : भारतीय डाक विभागाची विभागीय स्तरावरील डाक अदालत शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी डाकघर सांगली यांच्या कार्यालयात आयोजित केली आहे. अदालतीसाठी तक्रारी स्वीकारण्याचा अंतिम दिनांक १० सप्टेंबर आहे, अशी माहिती डाकघर सांगली विभागाचे प्रवर अधीक्षक अ. रा. खोरोटे यांनी दिली.