पोलीस भरतीतील विकल्प देण्यासाठी २२ पर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:31 IST2021-08-13T04:31:09+5:302021-08-13T04:31:09+5:30
सांगली : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या जाहिरातीमध्ये सुधारणा करण्याचे ...

पोलीस भरतीतील विकल्प देण्यासाठी २२ पर्यंत मुदतवाढ
सांगली : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या जाहिरातीमध्ये सुधारणा करण्याचे शुध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले होते. मात्र, तरीही अनेक उमेदवारांना ई-मेल आयडी लक्षात नाही अथवा अन्य कारणाने माहिती अद्ययावत करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आता २२ ऑगस्टपर्यंत विकल्प भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
पोलीस शिपाई व चालक भरतीसाठी ५ ऑगस्टला शुध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले होते. अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचा पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळविण्यात आले होते. पासवर्ड सर्व उमेदवारांनी बदलणे गरजेचे आहे. एसईबीसीच्या उमेदवारांना ‘अराखीव किंवा ईडब्ल्यूएस यापैकी एक विकल्प देणे गरजेचे आहे. परंतु, काही उमेदवार ई-मेल आयडी विसरले आहेत किंवा हरवला असल्याच्या तक्रारी आल्याने आता २२ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन पोलीस कॉर्नर बटणावर क्लिक करुन ‘पोलीस भरती २०१९’मध्ये सांगली विकल्प निवडून आपला ई-मेल व पासवर्डविषयक बदल करुन घ्यावा, असे आवाहन अधीक्षक गेडाम यांनी केले आहे.