सांगलीत पावसाची उघडीप, ढगांची दाटी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST2021-05-18T04:27:25+5:302021-05-18T04:27:25+5:30
तौक्ते चक्रीवादळामुळे गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात पावसाने मुक्काम केला होता. चक्रीवादळामुळे पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा ...

सांगलीत पावसाची उघडीप, ढगांची दाटी कायम
तौक्ते चक्रीवादळामुळे गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात पावसाने मुक्काम केला होता. चक्रीवादळामुळे पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता विरला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात पर्यायाने सांगली जिल्ह्यात वादळी पावसाचा जोर ओसरला. सांगली, मिरज शहरात सोमवारी दिवसभर उघडीप मिळाली. सायंकाळी पुन्हा ढगांची दाटी झाली. वादळी वारे अद्याप वाहात असून त्याचाही जोर मंगळवारी सायंकाळपर्यंत ओसरण्याची चिन्हे आहेत.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत चक्रीवादळाचा परिणाम पूर्णपणे ओसरणार आहे. गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारांचे व फांद्या पडून मालमत्तांचे नुकसान झाले आहे. कमी दाबाचा पट्टा विरल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
चौकट
कमाल तापमानाचा असाही विक्रम
दोन दिवसांच्या वादळी वाऱ्यामुळे व पावसाने जिल्ह्याच्या कमाल तापमानात कमालीची घट झाली. आजवर कमाल तापमानाचा नीचांक १५ मे २०१५ रोजी नोंदला गेला होता. त्यावेळी २९.५ इतके कमी कमाल तापमान नोंदले गेले होते. सोमवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २६.९ नोंदले गेले. जिल्ह्याच्या हवामान इतिहासात मे महिन्यातील हा नीचांक आहे.