शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

सांगली जिल्ह्यातून निर्यातीला प्रारंभ, आखाती देशांत द्राक्षाचे चार कंटेनर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:35 IST

सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात मिरजेतील खासगी निर्यातदार कंपनीकडून चार कंटेनरमधून ६० टन द्राक्षे आखातात रवाना झाली. १० जानेवारीपासून निर्यात वेग घेईल. दरम्यान, निर्यातीदरम्यानच्या ७ टक्के कटला पद्धतीविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातून निर्यातीला प्रारंभआखाती देशांत द्राक्षाचे चार कंटेनर रवाना

सांगली : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात मिरजेतील खासगी निर्यातदार कंपनीकडून चार कंटेनरमधून ६० टन द्राक्षे आखातात रवाना झाली. १० जानेवारीपासून निर्यात वेग घेईल. दरम्यान, निर्यातीदरम्यानच्या ७ टक्के कटला पद्धतीविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.गेल्यावर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट केली. यंदा मात्र तशी स्थिती नाही. लांबलेल्या पावसाने छाटण्या खोळंबून सुमारे २० टक्के बागा वाया गेल्या. त्यामुळे द्राक्षे मुबलक नाहीत. कोरोनावर आरोग्यदायी म्हणून मागणीही चांगली आहे. साहजिकच चांगला दर मिळत आहे.पहिल्याच टप्प्यात दणकेबाज दरसध्या सुपर सोनाकाला चार किलोच्या पेटीला ३५० ते ४१० रुपये दर मिळत आहे. आरके ३७० ते ४२०, अनुष्का ४०० ते ४२०, मिडियम सुपर ३२० ते ३५० असा दणदणीत दर आहे. शरदला चक्क ५५० ते ६०० रुपये मिळत आहे.कटल्याविरोधात बागायतदार आक्रमकनिर्यातीच्या द्राक्षामध्ये ७ टक्के कटला घेतला जातो. म्हणजे एकूण द्राक्षापैकी ७ टक्के खराब म्हणून काढली जातात. घट-तूटीच्या नावाखाली कमी पैसे दिले जातात. याविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. निर्यातीच्या बागा व्यापार्याकडे उतरणीसाठी देण्यापूर्वी शेतकरी स्वत:च खराब माल बाजुला काढतात, तरीही प्रत्यक्ष हार्वेस्टींगवेळी पुन्हा ७ टक्के कटला घेतात. अशा व्यापार्यांना हार्वेस्टींग करु देणार नाही अशी शेतकर्यांची भूमिका आहे. हार्वेस्टींग करणारी टोळी प्रत्येक गाडीमागे ५०० ते २००० रुपयांची खुशाली घेते. अशा कंपन्या अथवा व्यापार्यांना माल देऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.

सात टक्के कटल्यामुळे निर्यातीच्या द्राक्षांना स्थानिक बाजारपेठेचाच दर मिळतो. बागेसाठी लाखो रुपये खर्चानंतरही भुर्दंड सोसावा लागतो.- नागेश कुंभार, बागायतदार, सावळज

घट, तूट आणि चांगल्या मालाच्या नावाखाली कटला घेतला जातो. यामुळे शेतकर्याची थेट लूट होते. निर्यातीसाठी जीवापाड जपलेल्या बागेतील मालाची नासाडी होते.- अनिल माळी, बागायतदार, सावळज

टॅग्स :fruitsफळेSangliसांगली