शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

सांगली जिल्ह्यातून द्राक्षाच्या निर्यातीचा श्रीगणेशा, नऊ कंटेनर दुबईला रवाना

By अशोक डोंबाळे | Updated: January 1, 2025 13:11 IST

पावणे नऊ हजार शेतकऱ्यांकडून ४७९७ हेक्टरवर निर्यात द्राक्षांची नोंदणी

अशोक डोंबाळेसांगली : निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली असून सौदी अरेबिया आणि दुबई या देशांमध्ये नऊ कंटेनरमधून १७२ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या सांगलीच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे. नऊ हजार शेतकऱ्यांकडून पाच हजार ४०० हेक्टर क्षेत्राची निर्यात द्राक्षांसाठी नोंदणी झाली आहे.द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. २०२२-२३ या वर्षात जिल्ह्यातून युरोपियन देशात ८२५ कंटेनरमधून ९ हजार ७०२ टन तर आखाती देशात ४८९ कंटेनरने ७ हजार ६१५ टन अशी एकूण १७ हजार ९३७ टन द्राक्षे निर्यात झाली होती. त्यातून १८० कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. २०२३-२४ या वर्षात ८३४ टनाने द्राक्ष निर्यात वाढून १८ हजार ७७१ टन द्राक्षाची जिल्ह्यातून निर्यात झाली होती. त्यातून जिल्ह्याला १८७ कोटींचे परकीय चलन मिळाले होते.२०२४-२५ या वर्षात जिल्ह्यातून नऊ हजारांवर शेतकऱ्यांनी पाच हजार ४०० हेक्टर क्षेत्राची द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. दुबई आणि सौदी अरेबियाला निर्यात सुरू झाली असून पहिल्या नऊ कंटेनरमधून १२७ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

द्राक्ष निर्यातीत मिरज, जत तालुक्यांची आघाडीजिल्ह्यातून सर्वाधिक निर्यात द्राक्षाचे क्षेत्र मिरज तालुक्यात एक हजार ४७४ हेक्टर असून त्यानंतर एक हजार ३९७ हेक्टरसह जत तालुक्याचा नंबर लागत आहे. दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जत तालुक्याने द्राक्ष निर्यातीत आघाडी घेतल्याचे दिसत आहे.पेटीला ४०० रुपयांवर दरजिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आता सुरू झाला आहे. ४०० रुपये ते ४८० रुपये पेटी (प्रति ४ किलो) असा दर मिळाला आहे, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील २० ते २५ टक्के बागा डिसेंबर व जानेवारी महिन्यात काढणीला येतील, असेही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

निर्यात द्राक्षासाठी अशी झाली नोंदणीतालुका - शेतकरी संख्या - क्षेत्र हेक्टरमध्ये

  • मिरज - २६३३  -१४७४
  • वाळवा - १४७  - ७१
  • तासगाव - १४८० - ८६२
  • खानापूर - ९२७  -५७७
  • पलूस - २१० - २०५
  • कडेगाव - २५  - २१
  • आटपाडी - १२३ - ७३
  • जत - २१३२ - १२९७
  • क.महांकाळ - ११३८ - ५०८

नैसर्गिक संकटावर मात करून शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षे उत्तम दर्जाची तयार केली आहेत. शेतकऱ्यांची नोंदणी वाढली असून द्राक्षांची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. दुबई, सौदी अरेबियाला निर्यात सुरू झाली असून युरोपला जानेवारीत सुरुवात होईल. -विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी