राममंदिर चौक ते सिव्हिल रस्त्याचे कामाबाबत खुलासा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:36+5:302021-06-09T04:34:36+5:30
सांगली : येथील राममंदिर चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्ता महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी वाहतुकीसाठी खुला केला. पण या रस्त्याच्या ...

राममंदिर चौक ते सिव्हिल रस्त्याचे कामाबाबत खुलासा करा
सांगली : येथील राममंदिर चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्ता महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी वाहतुकीसाठी खुला केला. पण या रस्त्याच्या काम पूर्ण झाले आहे? रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे हटविली आहेत का, याचा खुलासा त्यांनी करावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केले.
शहराला पहिला ट्रिमिक्स काँक्रीटचा हा रस्ता आहे. रस्त्याचे काम अजून पूर्ण झालेले नसताना तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार झाले आहे का? असा सवाल करून साखळकर म्हणाले की, रस्त्याच्या कडेला आरसीसी पाईपचे काम अजून पूर्ण झालेले दिसत नाही. रस्त्यावर अतिक्रमण आहे. तेही काढलेले नाही. कुणाचे तरी अतिक्रमण वाचविण्याचा हा प्रयत्न आहे. फुटपाथचे काम झालेले नाही. जोडरस्त्यासाठी मुरूम टाकला आहे. तोही जागेवर राहिलेला नाही. त्यामुळे डांबरी जोडरस्ता करण्याची गरज आहे, असेही साखळकर म्हणाले.