शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्य बसेस १९१, लालपरी आल्या ४०, एसटी बसेस संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:23 IST

सांगली जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या १९१ बसेस असून, महामंडळाकडून केवळ लालपरीच्या ४० नवीन बसेस मिळाल्या आहेत. नवीन बसेसच नसल्यामुळे कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या, या प्रशासनाच्या धोरणामुळे जिल्ह्याची लाल परी सध्या संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देकालबाह्य बसेस १९१, लालपरी आल्या ४०एसटी बसेस संकटात

सांगली : जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या १९१ बसेस असून, महामंडळाकडून केवळ लालपरीच्या ४० नवीन बसेस मिळाल्या आहेत. नवीन बसेसच नसल्यामुळे कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या, या प्रशासनाच्या धोरणामुळे जिल्ह्याची लाल परी सध्या संकटात सापडली आहे.तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडता येत नाहीत. पण, बसेसच नसल्यामुळे नियम मोडून चार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या आणि पाच ते सहा वर्षाच्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर जात आहेत. जिल्ह्यातील आगारांकडे सध्या ८२६ बसेस आहेत. त्यापैकी १९१ बसेस दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या आहेत.

नवीन बसेस मिळत नसल्याने जुन्याच बसेस दुरूस्त करून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. या बसेसही रोज १०० ते २०० किलोमीटर अंतर धावून येत आहेत. या बसेस कधी रस्त्यातच बंद पडत आहेत, तर कधी गळक्या छतामुळे पावसाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर पडत आहे. एसटीच्यासांगली विभागाकडे कालबाह्य बसेसची १९१ संख्या असताना, महामंडळाकडून सहा महिन्यात केवळ ४० लालपरी बसेस मिळाल्या आहेत. स्टील बॉडीच्या या नवीन बसेस प्रवाशांच्या पसंतीस मात्र उतरल्या नाहीत.आगारांकडे नवीन बसेस नसल्यामुळे लांबच्या मार्गावरही जुन्याच बसेस पाठवाव्या लागत आहेत. महामंडळाच्या नियमानुसार तीन लाख किलोमीटरपेक्षा कमी पळालेल्या बसच लांब पल्ल्याच्या मार्गावर पाठविण्याचा नियम आहे. परंतु, मागील दोन वर्षात फारशा नवीन बसची खरेदी झालेली नाही. यामुळे सध्या एसटीच्या ताफ्यातील ८२६ बसेसपैकी ९५ टक्के बसेस तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या आहेत.

सांगली, मिरज आगारातून रोज पुणे, नाशिक, नांदेड, सोलापूर, परभणी, अहमदनगर, बारामती मार्गावर अनेक जुन्या बसेस धावत आहेत. या मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसची संख्याही जास्त आहे. बसेस चांगल्या असल्यामुळे एसटीचा प्रवासी तिकडे जाताना दिसत आहे.

टॅग्स :state transportएसटीSangliसांगली