कुपवाडमध्ये हद्दपार गुन्हेगारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST2021-04-04T04:28:10+5:302021-04-04T04:28:10+5:30
कुपवाड : शहरातील रेकाॅडवरील संशयित असिफ अकबर शेख (वय २२, रा. शिवशक्तीनगर, कुपवाड) यास जिल्हाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कुपवाड ...

कुपवाडमध्ये हद्दपार गुन्हेगारास अटक
कुपवाड : शहरातील रेकाॅडवरील संशयित असिफ अकबर शेख (वय २२, रा. शिवशक्तीनगर, कुपवाड) यास जिल्हाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी शुक्रवारी रात्री कुपवाड-मिरज रस्त्यालगत फिरताना अटक केली.
रेकाॅडवरील संशयित असिफ शेख याला मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांनी १ मार्च २०२१ पासून सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. त्याच्या विरोधात कुपवाड पोलिसांत विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात फिरत होता.
शुक्रवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, सहायक फौजदार युवराज पाटील, सतीश माने, इंद्रजीत चेळकर यासह इतर पोलीस शहरात गस्तीवर होते. त्यावेळी रेकाॅर्डवरील तडीपार संशयित शेख हा कुपवाड-मिरज रस्त्यालगत फिरत हाेता. कुुुपवाड पोलिसांनी त्याला अटक केली.