जत परिसरात शिवजयंतीचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST2021-02-20T05:20:53+5:302021-02-20T05:20:53+5:30

जत : जत शहरात व तालुक्यात सर्वत्र शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील ...

Excitement of Shiva Jayanti in Jat area | जत परिसरात शिवजयंतीचा उत्साह

जत परिसरात शिवजयंतीचा उत्साह

जत : जत शहरात व तालुक्यात सर्वत्र शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील शिवाजी चौकात मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

यावेळी किल्ले रामगड येेथून आणलेल्या मशालीचे स्वागत करण्यात आले. यानंतर आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते सिंहासनारूढ शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती सुरेश शिंदे, केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या पुणे विभागाचे संचालक प्रकाश जमदाडे, संजय कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त विविध गटातील विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या व त्यांना बक्षिसे देण्यात आली.

चौकट

अश्वारुढ पुतळ्याची मागणी

शिवाजी चौकात असलेला चबुतरा शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारूढ पुतळ्याच्या प्रतीक्षेत मागील सोळा वर्षे आहे. चबुतरा तयार करण्याचे काम झाले आहे. अश्वारूढ पुतळा बसवावा, अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांतूून होत आहे.

Web Title: Excitement of Shiva Jayanti in Jat area