‘आष्टा पीपल्स’च्या व्यवस्थापन समिती सदस्य निवडी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:49+5:302021-08-14T04:32:49+5:30
१३अभिनंदन शेटे, १३प्रीती पाचोरे, १३सुरेश कबाडे लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील दि आष्टा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बोर्ड ऑफ ...

‘आष्टा पीपल्स’च्या व्यवस्थापन समिती सदस्य निवडी उत्साहात
१३अभिनंदन शेटे,
१३प्रीती पाचोरे,
१३सुरेश कबाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील दि आष्टा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी बँकेचे अध्यक्ष बबन थोटे, दिलीप वग्यानी, अनिल चौगुले, सुरेश चौगुले, अभिनंदन शेटे, प्रीती पाचोरे, सुरेश कबाडे यांची निवड झाली. या निवडी आरबीआयच्या सूचनेनुसार करण्यात आल्या.
नूतन व्यवस्थापन समिती सदस्यांचा सत्कार बँकेचे उपाध्यक्ष अजित शिरगावकर, संचालक जयदीप थोटे, कौशिक वग्यानी, फंचू हांलुंडे, विराज शिंदे, सुनील वाडकर, अनिल पाटील, अनिल मडके, रामचंद्र सिद्ध, उषाराणी आवटी, विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती मासाळ उपस्थित होते.
अध्यक्ष बबन थोटे व दिलीप वग्यानी यांना प्रदीर्घ बँकिंग कामाचा अनुभव आहे. सुरेश चौगुले हे बँकिंग तज्ज्ञ, अभिनंदन शेटे हे वकील, प्रीती पाचोरे सीए, अनिल चौगुले व सुरेश कबाडे हे कृषितज्ज्ञ आहेत. जयदीप थोटे व कौशिक वग्यानी यांच्या हस्ते नूतन सदस्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
दिलीप वग्यानी म्हणाले, बँकेचे व्यवस्थापन, भांडवल पर्याप्तता, सीडी रेशो प्रमाण अतिशय चांगला आहे. थकबाकी व एनपीए नाममात्र आहे. बँकेने अद्यावत कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब केला असून सध्या बँक आयएमपीएस मोबाईल बँकिंग, एटीएम कार्ड, आरटीजीएस, एनएफटी, एसएमएस बँकिंग या अत्याधुनिक सेवा सुविधा ग्राहकांना पुरवत आहे.