मैदानी निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:19+5:302021-01-19T04:27:19+5:30

सांगलीत जिल्हा मैदानी निवड चाचणी स्पर्धेचे उद‌्घाटन क्रीडाधिकारी तानाजी मोरे यांनी केले. याप्रसंगी गणेश सिंहासने, संजय पाटील, बाळासाहेब माने ...

In the excitement of the field selection test competition | मैदानी निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

मैदानी निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

सांगलीत जिल्हा मैदानी निवड चाचणी स्पर्धेचे उद‌्घाटन क्रीडाधिकारी तानाजी मोरे यांनी केले. याप्रसंगी गणेश सिंहासने, संजय पाटील, बाळासाहेब माने आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ॲमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हा मैदानी निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. क्रीडा संकुलात स्पर्धेसाठी जिल्हाभरातून ८५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

क्रीडाधिकारी तानाजी मोरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू युवराज खटके यांनी उदघाटन केले. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत आदित्य लोखंडे, नयन पाटणकर, रोहित कदम विजेते ठरले. २०० मीटर धावण्यात संकेत पाटील, रोहित कदम, सूरज जाधव तर ४०० मीटर धावण्यात सूरज जाधव, धनराज खत्री व आदित्य पाटील विजेते ठरले. असोसिएशनचे सचिव संजय मोरे यांनी सांगितले की, कोरोना संकटानंतर प्रथमच स्पर्धांचे यशस्वी आयोजन झाले. स्पर्धांसाठी पंच म्हणून हिम्मत पाटील, उदय गायकवाड, विजयकुमार शिंदे, राजेंद्र कदम, सुहास व्हनमाने, अक्रम मुजावर, गंगा बिराजदार, माया खटके, गजानन सुतार, राहूल कांबळे, शिवाजी वाडकर, आर्यदीप लोंढे, निखील पावले, पवन घोडके, अविनाश वाघमारे यांनी काम पाहिले. संयोजन बाळासाहेब माने, राजेंद्र कदम, गणेश सिंहासने आदींनी केले.

-------------

Web Title: In the excitement of the field selection test competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.