डांगे आयुर्वेदिक महाविद्यालयात संस्कार सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:10+5:302021-04-04T04:27:10+5:30

आष्टा : आष्टा येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयात प्रथम वर्ष बीएएमएसच्या विद्यार्थ्यांचा ‘शिष्योपनयनीय संस्कार सोहळा’ उत्साहात ...

Excitement ceremony at Dange Ayurvedic College | डांगे आयुर्वेदिक महाविद्यालयात संस्कार सोहळा उत्साहात

डांगे आयुर्वेदिक महाविद्यालयात संस्कार सोहळा उत्साहात

आष्टा : आष्टा

येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयात प्रथम वर्ष बीएएमएसच्या विद्यार्थ्यांचा ‘शिष्योपनयनीय संस्कार सोहळा’ उत्साहात झाला. आयुर्वेद विद्याशाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी या संस्कार विधीला भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

डॉ. विनायक गरुड यांनी संस्कार विधीचे पौरोहित्य केले.

यावेळी होम-हवन, मंत्रपठण व सूत्रबंधन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून प्रतिज्ञा ग्रहण केली. प्रा. वसंतराव हंकारे यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. एस. एन. ओझा यांनी महाविद्यालय गुणवत्तेने परिपूर्ण असून डांगे संकुलात विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव. ॲड. राजेंद्र ऊर्फ चिमण

डांगे यांनी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेळेचे नियोजन करावे व परिश्रम घेऊन संस्थेची शिस्त व गुणवत्ता कायम ठेवावी, असे आवाहन केले.

संस्थेचे उपाध्यक्ष. ॲड. संपतराव पाटील, खजिनदार विठ्ठलराव मुसाई प्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन सौगंध थोरात यांनी केले. डॉ. सुभाष पत्की यांनी परिचय करून दिला. शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. सुहास राजमाने यांनी आभार मानले. डॉ. राजश्री भारती, डॉ. अमित पेठकर, डॉ. आशाराणी कोरे, डॉ. सर्फराज लांडगे, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. शीतल पाटील, डॉ. राजअहमद जमादार यांनी संयोजन केले.

फोटो : ०३ आष्टा २

ओळ : अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा संस्कार सोहळा उत्साहात झाला. यावेळी प्रा. वसंत हंकारे, ॲड. चिमण डांगे, प्राचार्य डॉ. एस. एन. ओझा, डॉ. सुभाष पत्की, डॉ. अमित पेठकर, डॉ. विनायक गरुड उपस्थित हाेते.

Web Title: Excitement ceremony at Dange Ayurvedic College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.