शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

केंद्रीय पथकाकडून कागदपत्रांची तपासणी सुरू : स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान, महापालिकेची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:22 PM

सांगली : शासनाच्या स्वच्छ सर्र्व्हेक्षण अतंर्गत गुरुवारी केंद्रीय समितीने स्वच्छता, घनकचरा, सुलभ शौचालय, वैयक्तिक शौचालय योजनेसह महापालिका राबवित असलेल्या विविध प्रकल्पांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू झाली आहे

ठळक मुद्दे रविवारी शहरातील प्रकल्पांची पाहणी करणार

सांगली : शासनाच्या स्वच्छ सर्र्व्हेक्षण अतंर्गत गुरुवारी केंद्रीय समितीने स्वच्छता, घनकचरा, सुलभ शौचालय, वैयक्तिक शौचालय योजनेसह महापालिका राबवित असलेल्या विविध प्रकल्पांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू झाली आहे. सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर शनिवार, रविवारी पथकाकडून काही ठिकाणी स्थळ पाहणी करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्र्व्हेक्षण स्पर्धेत देशात ५० शहरांच्या यादीत येण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड महापालिका उतरली आहे. शहरात स्वच्छता, कचरा उठाव, औषध फवारणी यासह अनेक उपाययोजना पहाटेपासून सुरु होत्या. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गेल्या दोन दिवसांपासून पहाटेपर्यंत अधिकारी, कर्मचाºयांच्या बैठका घेत आहेत. स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत स्वच्छता अ‍ॅपमध्ये देशात १५ वा, तर महाराष्ट्रात प्रथम आल्यानंतर प्रशासनाचे होप्स वाढले आहेत. बुधवारी स्वच्छ सर्व्हेक्षणची दिल्ली येथील केंद्रीय समिती सांगलीत दाखल झाली आहे. समितीचे प्रमुख कुमार जाधव, सदस्य जमीर लांडगे, रणलेक फासे ही समिती दाखल झाली आहे.

आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी बुधवारी सकाळी उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख, प्रमुख अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. सकाळी आल्यानंतर केंद्रीय समितीने महापालिका स्वच्छ सर्र्व्हेक्षण अतंर्गत राबवत असलेल्या प्रकल्पाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली. ड्रेनेज योजना, पाणीपुरवठा योजना, सुलभ शौचालय, वैयक्तिक शौचालय योजना, घनकचरा प्रकल्पांतर्गत खत प्रकल्प, प्लास्टिक निर्मूलन अतंर्गत कापडी पिशव्या तयार करणे, याचबरोबर लोकसहभागाने सुरू असलेल्या योजनांचे प्रस्ताव, यातील कागदपत्रांची माहिती घ्यायला समितीच्या सदस्यांनी सुरुवात केली आहे. आरसीएच सेंटरमध्ये केंद्रीय पथकाने कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. पुन्हा संध्याकाळी आयुक्त खेबूडकर यांनी प्रमुख अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. हे पथक कागदपत्रे तपासून ती केंद्राकडे अपलोड करीत आहेत.केंद्रीय पथकाकडून गुरुवारी महापालिका राबवित असलेल्या विविध प्रकल्पांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.