इस्लामपुरात माजी सैनिकांचे उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:57+5:302021-02-05T07:28:57+5:30

इस्लामपूर : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका बसलेल्या साखराळे (ता. वाळवा) येथील चार माजी सैनिकांचे कुटुंबीय गेल्या तीन ...

Ex-servicemen continue hunger strike in Islampur | इस्लामपुरात माजी सैनिकांचे उपोषण सुरूच

इस्लामपुरात माजी सैनिकांचे उपोषण सुरूच

इस्लामपूर : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका बसलेल्या साखराळे (ता. वाळवा) येथील चार माजी सैनिकांचे कुटुंबीय गेल्या तीन दिवसांपासून येथील प्रशासकीय कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून या घटनेचा अहवाल मागवून घेतला आहे.

सचिन भगवान पवार, गणेश बाबूराव बोकारे, महेश मानसिंग उथळे आणि सुभाष बजरंग शिंदे अशी उपोषणास बसलेल्या माजी सैनिकांची नावे आहेत. यातील सुभाष शिंदे हे सध्या पोलीस दलात कार्यरत आहेत.

या सर्वांनी शासकीय परिपत्रकानुसार घरबांधणीसाठी जागा मागणीचे अर्ज केले होते. त्यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी सि. स. नं. २९३ मधील प्रत्येकी तीन ते साडेतीन गुंठे जागा देण्याचे आदेश सप्टेंबर २०२० मध्ये काढले होते. त्यानुसार या सर्वांनी उधार-उसनवार आणि स्वत:जवळील सोने तारण ठेवून जवळपास ३० लाख रुपयांहून अधिक रक्कम शासनाकडे जमा केली होती. त्यानंतरही या माजी सैनिकांना त्यांची जागा ताब्यात मिळाली नाही.

प्रांत पाटील यांनी २० जानेवारीला आपलाच आदेश फिरवत ही जागा शासनाची असल्याचे सांगत ही जागा देता येणार नाही, असा आदेश कोतवालामार्फत बजावला. त्यानंतर या माजी सैनिकांना न्याय मिळविण्यासाठी पुन्हा त्यांच्याच दारात उपोषण करण्याची वेळ आली आहे.

Web Title: Ex-servicemen continue hunger strike in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.