पक्षवाढीसाठी सर्वांचे योगदान गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:08+5:302021-09-02T04:56:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलून पक्ष वाढविणे, युवकांचे संघटन, विकासकामे तळागाळापर्यंत पोचवून आपण ...

पक्षवाढीसाठी सर्वांचे योगदान गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलून पक्ष वाढविणे, युवकांचे संघटन, विकासकामे तळागाळापर्यंत पोचवून आपण सर्वांनी पक्षासाठी, समाजकारणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांना विराज नाईक व पक्षनिरीक्षक अरुण आसबे यांच्या हस्ते नेमणूक पत्र देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
शिराळा तालुकाध्यक्षपदी निवड झालेले हर्षद बाळासो माने (पाचुंब्री) व शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या साधना राजाराम पाटील (वाकुर्डे खुर्द) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, भारतीताई शेवाळे, माजी आमदार सदाशिवराव पाटील, बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, सुश्मिता जाधव, शरद लाड, भरत देशमुख आदी उपस्थित होते.