लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:49+5:302021-02-05T07:20:49+5:30
आष्टा : मतदान हा आपला अधिकार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे ...

लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करावे
आष्टा : मतदान हा आपला अधिकार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
येथील विलासराव शिंदे विद्यालयात मतदान जागृती दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन तहसीलदार देशपांडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, नायब तहसीलदार बाजीराव पाटील, प्राचार्य विशाल शिंदे, महेश वाहवळ,अशोक पाटील, शहाजी पाटील, डी. बी. पाटील, विजय हाबळे, अजित जाधव, सुधाकर क्षीरसागर, गणपती शिंदे, शशिकांत सोकाशी उपस्थित होते. शहाजी पाटील यांनी स्वागत केले. डी. बी पाटील यांनी आभार मानले.
फोटो : २८०१२०२१-आयएसएलएम-आष्टा न्यूज
आष्टा येथील विलासराव शिंदे विद्यालयात तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचा सत्कार वैभव शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी विशाल शिंदे, बाजीराव पाटील,डी. बी. पाटील उपस्थित होते.