एव्हरेस्टवीर गुरव यांची युरोपातील सर्वोच्च शिखरावर चढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:55+5:302021-07-28T04:27:55+5:30
एव्हरेस्टवीर संभाजी गुरव यांना युरोपातील एल्ब्रस शिखरावर यशस्वी चढाई केली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : एव्हरेस्टवीर सहायक पोलीस निरीक्षक ...

एव्हरेस्टवीर गुरव यांची युरोपातील सर्वोच्च शिखरावर चढाई
एव्हरेस्टवीर संभाजी गुरव यांना युरोपातील एल्ब्रस शिखरावर यशस्वी चढाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : एव्हरेस्टवीर सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी युरोप खंडातील एल्ब्रस हे सर्वोच्च शिखरही सर केले. सोमवारी (दि.२६) पहाटे तीन वाजता शिखरावर यशाचा झेंडा फडकाविला. पाच तासांच्या अखंड चढाईनंतर शिखर पादाक्रांत केले.
मोहिमेचे ब्रीदवाक्य असलेला ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ हा ध्वज फडकावला. विशेष म्हणजे या मोहिमेत त्यांच्यासोबत १२ वर्षांची ब्रिटिश मुलगीही होती. जाधव यांनी सांगितले की, एल्ब्रस हा युरोपातील सर्वांत उंच पर्वत आहे. उंची ५,६४२ मीटर असून, काळा समुद्र व कॅरेबियन समुद्राच्या मध्यभागी उभा आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तो तयार झाला आहे. रात्रीचे तापमान उणे २५ ते उणे ४० अंश सेल्सिअस असते. शिखराची उंची तुलनेने कमी असली तरी गिर्यारोहकांना भेडसावणाऱ्या समस्या वेगवेगळ्या असतात. सतत बदलणारे वातावरण, बर्फवृष्टीचा सामना करावा लागतो. याचा धैर्याने सामना करत शिखर सर केले.
गुरव हे पडवळवाडी (ता. वाळवा) येथील रहिवासी आहेत.