एव्हरेस्टवीर संभाजी गुरव यांचा इस्लामपुरात गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:59+5:302021-05-31T04:19:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केलेले वाळवा तालुक्यातील पडवळवाडीचे सुपुत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक ...

Everest hero Sambhaji Gurav's glory in Islampur | एव्हरेस्टवीर संभाजी गुरव यांचा इस्लामपुरात गौरव

एव्हरेस्टवीर संभाजी गुरव यांचा इस्लामपुरात गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केलेले वाळवा तालुक्यातील पडवळवाडीचे सुपुत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांचा पालकमंत्री जयंत पाटील यांनी राजारामनगर येथे सन्मान केला.

एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे पार करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. आम्हास सार्थ अभिमान आहे, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले. पाटील यांनी गुरव यांचे त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल अभिनंदन केले. यावेळी एव्हरेस्ट शिखर सर करण्याची तयारी कशी केली, शिखर सर करताना कोणत्या अडचणी आल्या, अशी विचारणा पाटील यांनी केली. गुरव यांनी एव्हरेस्ट शिखर सर करताना आलेल्या अडचणी, हे शिखर सर करताना काय घडते, हे सांगत असताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभा राहत होता.

याप्रसंगी युवानेते प्रतीक पाटील, पडवळवाडीचे माजी सरपंच सुधीर नांगरे, विशाल कोकाटे, पृथ्वीराज कोकाटे, अभिषेक खोत, चंद्रकांत कोकाटे उपस्थित होते.

चौकट

संभाजी गुरव सध्या नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी तयारी करत होते. गेल्या रविवारी त्यांनी एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तिरंगा ध्वज फडकविला. एव्हरेस्ट शिखराची उंची ८८४८ मीटर आहे. पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट शिखर सर करणारे ते पहिले मराठी पोलीस अधिकारी, तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले एव्हरेस्टवीर ठरले आहेत.

Web Title: Everest hero Sambhaji Gurav's glory in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.