शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'महिलांना मोफत प्रवास नसला तरी चालेल, पण पदवीपर्यंतचे शिक्षण द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 16:15 IST

कुंडल : देशातील महिलांना एसटीमधून मोफत प्रवास नसला तरी चालेल, पण पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत असायला हवे, ...

कुंडल : देशातील महिलांना एसटीमधून मोफत प्रवास नसला तरी चालेल, पण पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत असायला हवे, असे प्रतिपादन ॲड. वैशाली डोळस यांनी केले.त्या कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘क्रांतिअग्रणी’ व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘भारतातील स्त्रिया’ या विषयावर बोलत होत्या. उद्योजक चेतन पारेख अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार अरुण लाड, ॲड. प्रकाश लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, दिलीप लाड, ‘क्रांती’चे अध्यक्ष शरद लाड, व्ही. वाय. पाटील, सरपंच जयराज होवाळ प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड व क्रांतिवीरांगना विजयाताई लाड यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ॲड. वैशाली डोळस म्हणाल्या, शरीरातील बदल सोडला तर महिला पुरुषांइतक्याच सक्षम आहेत. स्त्री माणूस असून स्वतंत्र व्यक्ती व देशाची नागरिक आहे. त्यांना पुरुषांइतकाच हक्क आहे. महिलांना स्वातंत्र्य नसते हे सांगणारी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न सध्याची व्यवस्था करत आहे.वैवाहिक जीवन जोडत असतानाही सध्या पदव्यांचे मॅचिंग केले जात आहे. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचा विवाह आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. आमदार अरुण लाड यांनी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंचा जो सचित्र इतिहास मांडला आहे तो पुढील पिढीला प्रेरणा देणारा आहे. महिलांना माणूस म्हणून समजून घेतले पाहिजे. जगण्यातील वास्तविकता व दूरचित्रवाणीवरील आभासीपण आपल्याला समजले पाहिजे. आभासी संस्कृतीमुळे जीवन जगणे हरवत चालले आहे.पुरुषांच्या आशा, आकांक्षा माणूस म्हणून योग्य आहेत हे समाजाने मान्य केले, मात्र महिलांच्या जीवनातील आशा आकांक्षा ब्राह्मणी सत्तेने कधीच समजून घेतल्या नाहीत. उच्चभ्रू घराण्यातील महिलांवर जास्त बंधने घातली जात आहेत.यावेळी क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड, कुंडलिक एडके, प्रा. डॉ. प्रताप लाड, अरुण पवार, संदीप पवार, जगन्नाथ आवटे, दिनकर लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीWomenमहिलाEducationशिक्षण