शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

तासगावात मुदत संपली, तरी स्वच्छता ठेका कायम ठेकेदारीला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:03 IST

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहरातील स्वच्छतेच्या ठेक्याची मुदत ३० जूनला संपुष्टात आली आहे. तरीदेखील सत्ताधाऱ्यांकडून ठेकेदारीला अभय देण्यात आले आहे. कोणतीही मुदतवाढ न देताच शहरात स्वच्छतेचा ठेका रामभरोसे सुरू आहे. स्वच्छतेअभावी शहरात रोगराईने थैमान घातले आहे. जनतेच्या स्वच्छतेबाबतीत तक्रारी आहेत. नगरसेवकांतही नाराजी आहे. त्यामुळे मुदतवाढीच्या निर्णयाबाबत लक्ष लागून राहिले ...

ठळक मुद्देजनतेच्या जिवाशी खेळ; सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहरातील स्वच्छतेच्या ठेक्याची मुदत ३० जूनला संपुष्टात आली आहे. तरीदेखील सत्ताधाऱ्यांकडून ठेकेदारीला अभय देण्यात आले आहे. कोणतीही मुदतवाढ न देताच शहरात स्वच्छतेचा ठेका रामभरोसे सुरू आहे. स्वच्छतेअभावी शहरात रोगराईने थैमान घातले आहे. जनतेच्या स्वच्छतेबाबतीत तक्रारी आहेत. नगरसेवकांतही नाराजी आहे. त्यामुळे मुदतवाढीच्या निर्णयाबाबत लक्ष लागून राहिले आहे.

शहरात अनेक वर्षांपासून बिव्हीजीकडे शहर स्वच्छतेचा ठेका होता. मात्र गेल्या वर्षी सत्ताधाऱ्यांनी राष्टवादीच्या पदाधिकाºयाला शहर स्वच्छतेचा ठेका बेकायदेशीरपणे दिला. ठेका दिल्यापासून नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याने सत्ताधारी विरोधकांकडूनही ठेक्याला विरोध सुरू झाला. राष्टवादीच्या नगरसेवकांनीही ठेक्याला विरोध केला.

स्वच्छतेच्या ठेक्याला विरोध होत असतानाही सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांसह, नगराध्यक्षांनी ठेकेदाराचे तळ राखण्याचे काम केले. शहरात स्वच्छतेचा बोजवारा सुरू असताना ठेकेदाराला खुलेआमपणे अभय दिले. इतकेच नव्हे, तर काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात स्वच्छ भारत अभियानात पालिकेला चांगेल रॅँकिंग मिळण्यात ठेकदाराचा वाटा असल्याचे कोडकौतुकही केले.

एकीकडे स्वच्छतेचा डर्टी पिक्चर आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून ठेकेदाराला पोसण्याचे उद्योग अशा परस्थितीत ठेकेदाराने एक वर्ष पूर्ण केले. एक वर्षासाठी ठेका देण्यात आला होता. ३० जूनला स्वच्छतेच्या ठेक्याची मुदत संपुष्टात आली आहे. मुदत संपल्यानंतर संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ देण्यासाठी पालिकेच्या सभेत ठराव घेणे अपेक्षित होते; मात्र कोणताही ठराव न घेता मुदतवाढ न देताच शहरात स्वच्छतेचा ठेका सुरू आहे.

एकीकडे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य वाढत आहे. डासांच्या घनतेत मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे ठेकेदाराला पाठीशी घालणाºया सत्ताधाऱ्यांकडून ठेक्याची मुदत संपल्यानंतर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. वर्षभरापासून सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या ठेकेदाराला मुदतवाढ मिळणार की नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.ठेकेदाराच्या बोगसगिरीला नगराध्यक्षांची पाठराखणस्वच्छतेच्या ठेक्यासाठी वर्षाला एक कोटी रुपये खर्ची पडणार आहेत. हा ठेका घेण्यासाठी निकषांची पूर्तता करून एक वर्ष स्वच्छतेचा ठेका घेतल्याचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय ठेका मिळू शकत नव्हता. मात्र ठेकेदाराकडून बोगस प्रमाणपत्र जोडून ठेका घेण्यात आला. ही बोगसगिरी चव्हाट्यावर आल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. सावंत यांनी शहानिशा केली नाही. याउलट बोगस ठेक्याची पाठराखण करून पालिकेत सुरू असणाºया बोगस कारभाराची पाठराखणच सुरू केली. त्यामुळे नगराध्यक्षांच्या या पाठराखणीचे गौडबंगाल काय? असाच प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसfraudधोकेबाजीSangliसांगली