दुप्पट वेतन देऊनही परिचारिका मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:38+5:302021-05-28T04:20:38+5:30

मिरज : कोरोना साथीच्या काळात परिचारिकांना मागणी असल्याने कोविड हाॅस्पिटलमध्ये प्रशिक्षित परिचारिकांसह, नर्सिंग विद्यार्थ्यांनाही मागणी आहे. ...

Even after paying double the salary, the nurses could not be found | दुप्पट वेतन देऊनही परिचारिका मिळेनात

दुप्पट वेतन देऊनही परिचारिका मिळेनात

मिरज : कोरोना साथीच्या काळात परिचारिकांना मागणी असल्याने कोविड हाॅस्पिटलमध्ये प्रशिक्षित परिचारिकांसह, नर्सिंग विद्यार्थ्यांनाही मागणी आहे. खासगी हाॅस्पिटलमध्ये कोविड रुग्णसेवा करणाऱ्यांना दुप्पट वेतन देण्यात येत आहे. तरीही अनेक रुग्णालयांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोविड साथीमुळे शासकीय कोविड रुग्णालयासह मिरजेतील खासगी रुग्णालये फुल्ल आहेत. कोविड काळात संसर्गाचा धोका असतानाही डाॅक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी रुग्णसेवा करत आहेत. गतवर्षी कोविड साथीदरम्यान मिरजेतील अनेक रुग्णालयांतील शेकडो परिचारिकांना कोरोना संसर्गाचा सामना करावा लागला होता. कोविड रुग्णसेवेला नकार देणाऱ्या परिचारिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हेही दाखल केले होते. कोविड काळात उपचारासाठी दाखल रुग्णांची संख्या मोठी असल्याने परिचारकांचे काम महत्त्वाचे ठरले आहे. खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारकांना कमी वेतनात काम करावे लागते. मात्र, कोविड रुग्णसेवा करणाऱ्या परिचारकांना खासगी रुग्णालयात दुप्पट वेतनासह जेवण व राहण्याची सोय केली आहे. प्रशिक्षित परिचारकांसह प्रशिक्षणार्थी परिचारकांनाही मागणी आहे. नर्सिंग महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींनाही विविध रुग्णालयांत मागणी आहे. आठवडाभर कुटुंबापासून दूर राहून जीव धोक्यात घालून परिचारिका रुग्णसेवा करत असल्याचे चित्र आहे.

चाैकट

परिचारिकांच्याही कॅम्पस मुलाखती

मिरजेतील सिव्हील, वाॅनलेस, भारती हाॅस्पिटलसह मोठ्या रुग्णालयांमध्ये नर्सिंग पदवी अभ्यासक्रमाची सोय आहे. मिरजेतील परिचर्या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठ्या शहरातील कार्पोरेट रुग्णालयात काम करत आहेत. गेल्यावर्षापासून मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलतर्फे मुलाखतीतून पदवीधर परिचारिकांना नोकरी देण्यात आली. अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतीद्धारे विद्यार्थांची नोकरीसाठी निवडीची पद्धत आहे. आता काॅर्पोरेट रुग्णालयांकडून मुलाखतीद्धारे परिचारिकांची भरती सुरु झाली आहे. मुंबई, पुण्यातील काॅर्पोरेट रुग्णालयांमध्ये पदवीधर परिचारक विद्यार्थांना मोठी मागणी आहे.

Web Title: Even after paying double the salary, the nurses could not be found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.