यंग जायंट्स ऑफ शिराळा प्राईडची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:22+5:302021-02-06T04:48:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा येथे जायंट्स वेल्फेअर फौंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी यांच्या संयुक्त विद्यमाने ...

यंग जायंट्स ऑफ शिराळा प्राईडची स्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा येथे जायंट्स वेल्फेअर फौंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी यांच्या संयुक्त विद्यमाने यंग जायंट्स ऑफ शिराळा प्राईड या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली. सामाजिक कार्य व उपक्रम युवकांच्यामार्फत घडावेत या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक पाटील आणि विराज उद्योग समूहाचे विराज नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शपथविधी कार्यक्रम पार पडला. प्रतीक पाटील यांनी जायंट्स ग्रुपच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मांडण्याचे आवाहन केले.
यंग जायंट्स ऑफ शिराळा प्राईडच्या अध्यक्षपदी विशाल खुर्द, उपाध्यक्षपदी विवेक पाटील, अथर्व चरणकर, कार्यवाहपदी प्रणव महाजन यांची निवड करण्यात आली.
नगराध्यक्षा सुनीता निकम, डॉ. सदानंद जोशी, डॉ. साधना मालगावे, भूषण शहा, श्रद्धा कुलकर्णी, चारुशीला फल्ले, जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या अध्यक्षा डॉ. शिल्पा कुरणे, कार्यवाह प्रज्ञा चरणकर उपस्थित होते.