लहान मुलांवरील उपचार, उपाययोजनांसाठी टास्क फोर्सची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:28 IST2021-05-27T04:28:54+5:302021-05-27T04:28:54+5:30

सांगली : लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांच्यावरील उपचाराच्या नियोजनास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार कोरोनाबाधित लहान मुलांसाठी रुग्णालयाची ...

Establishment of task force for treatment of children | लहान मुलांवरील उपचार, उपाययोजनांसाठी टास्क फोर्सची स्थापना

लहान मुलांवरील उपचार, उपाययोजनांसाठी टास्क फोर्सची स्थापना

सांगली : लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांच्यावरील उपचाराच्या नियोजनास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार कोरोनाबाधित लहान मुलांसाठी रुग्णालयाची संख्या वाढविण्याबरोबरच बेडचीही उपलब्धता करून घेण्यात येणार आहे. लहान मुलांवर उपचारांबाबत उपाययोजनांसाठी जिल्हास्तरीय पिडिॲट्रिक टास्क फोर्स समिती गठित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

या समितीच्या माध्यमातून बालकांवर उपचाराचे नियोजन अधिक प्रभावी होणार आहे. पिडिॲट्रिक टास्क फोर्स समिती लहान मुलांमधील कोरोनाच्या प्रादुर्भावास आळा घालणे, रोगाने ग्रस्त असलेल्या गंभीर व अतिगंभीर बालकांच्या बाबतीत रुग्ण व्यवस्थापन संहिता, योग्य औषधोपचार, कोविड रुग्णालयात डेडिकेटेड पिडिॲट्रिक कोविड रुग्णालयात आवश्यक असलेली उपकरणांची माहिती जिल्हा प्रशासनास देऊन इतर आवश्यक असलेल्या उपाययोजना सुचविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.

या समितीचे अध्यक्ष डॉ. शिशिर मिरगुंडे असून, डॉ. संभाजी वाघ, डॉ. सतीश आष्टेकर, डॉ. भावेश शहा, डॉ. सारा धनवडे, डॉ. प्रिया प्रभू, डॉ. विनायक पत्की, डॉ. श्रीनिवास, डॉ. अमित तगारे हे सदस्य म्हणून आहेत.

Web Title: Establishment of task force for treatment of children