शहराच्या विकासासाठी स्वच्छता मंचची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:35+5:302021-01-08T05:29:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या पुढाकाराने सामाजिक संघटनाना एकत्रित करून स्वच्छता ...

Establishment of Sanitation Forum for the development of the city | शहराच्या विकासासाठी स्वच्छता मंचची स्थापना

शहराच्या विकासासाठी स्वच्छता मंचची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या पुढाकाराने सामाजिक संघटनाना एकत्रित करून स्वच्छता मंचची स्थापना करण्यात आली आहे. संघटनांच्या प्रतिनिधींची पहिली बैठक सोमवारी मुख्यालयात पार पडली. महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. ‘ माझी वसुंधरा अभियान’ हाती घेतले आहे. महापालिकेच्या सर्व अभियानात लोकसहभाग वाढावा, यासाठी सर्व सामाजिक संघटनांना आवाहन केले होते. त्यानुसार महापालिका मुख्यालयात आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह इनरव्हिल क्लब, हिरवळ ग्रुप, सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फौंडेशन, निखिल ॲनालिटिकल रिसर्च लॅब, नागरिक जागृती मंच, यशवंत इंडस्ट्रीज, इनोरा बायोटेक, आयुष संस्था, रोटरी क्लब, निसर्ग प्रतिष्ठान, नॅकॉन्स, वालचंद अभियांत्रिकी, मिरज फडके क्लास, सूरज फौंडेशन, मदनी ट्रस्ट, पर्यावरण गतीविधी या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी शहराच्या विकासाच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने मते मांडली.

आयुक्त कापडणीस यांनी आजची बैठक ही प्राथमिक असून, पुढील बैठक पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या उपस्थितीत घेतली जाईल. या स्वच्छता मंचकडून महापालिका क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगितले. बैठकीचे आयोजन वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, शहर समन्वयक वर्षाराणी चव्हाण, अमोल माने यांनी केले होते.

फोटो ओळी : महापालिकेत शहरातील सामाजिक संघटना, संस्थांची बैठक आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत झाली.

Web Title: Establishment of Sanitation Forum for the development of the city