मिरज ‘सिव्हिल’मधून कोरोना पॉझिटिव्ह दरोडेखोराचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:25 IST2021-01-08T05:25:13+5:302021-01-08T05:25:13+5:30

कुपवाड पोलीस ठाण्यात अट्टल गुन्हेगार मेहडा याच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याने त्यास कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली ...

Escape of Corona positive robber from Miraj ‘Civil’ | मिरज ‘सिव्हिल’मधून कोरोना पॉझिटिव्ह दरोडेखोराचे पलायन

मिरज ‘सिव्हिल’मधून कोरोना पॉझिटिव्ह दरोडेखोराचे पलायन

कुपवाड पोलीस ठाण्यात अट्टल गुन्हेगार मेहडा याच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याने त्यास कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वैद्यकीय तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यास मिरज शासकीय रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मेहडा बाथरूममध्ये गेला व बाथरूममध्ये नळ सुरूच ठेवून तो खिडकीतून पसार झाला. मेहडा बराच वेळ बाहेर आला नसल्याने रुग्णालय कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला असता, तो खिडकीतून पळून गेल्याचे निदर्शनास आले.

कोरोना पॉझिटिव्ह असलेला आरोपी पळून गेल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी गांधी चाैक पोलिसांत मेहडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाबाधित आरोपी पोलीस व सिव्हिल प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने संबंधितांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

फाेटाे : ०४०१२०२१ केरामसिंह मेहडा

Web Title: Escape of Corona positive robber from Miraj ‘Civil’