शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांनी इंडस्ट्रीयल पार्क उभारावे - राजेंद्र पाटील यड्रावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:34 IST

सांगली : जैन समाज हा ३५ टक्के टॅक्स भरणारा समाज आहे. समाजातील उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. नव उद्योजकांना ...

सांगली : जैन समाज हा ३५ टक्के टॅक्स भरणारा समाज आहे. समाजातील उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. नव उद्योजकांना उभारी देण्यासाठी त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी जैन समाजातील सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन इंडस्ट्रीयल पार्कची उभारणी करावी, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने दिगंबर जैन उद्योजक, व्यापारी व सेवा संस्था यांचा मेळावा रविवार, दि. ६ रोजी धामणी येथील ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल येथे पार पडला. यामध्ये नव उद्योजक व बेरोजगारांसाठी उपयोगी ठरणाऱ्या जैन नेक्स्ट ॲपचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, उद्योजक अभिनंदन पाटील, अतुलभाई शहा-सराफ, किरण पाटील, रविंद्र माणगावे, शीतल दोशी, अण्णासाहेब चकोते व भालचंद्र पाटील उपस्थित होते.राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, उद्योग व व्यापार क्षेत्रात भरारी घेण्याची धडपड करणाऱ्या तरुणांना बळ देण्याची, त्यांच्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करुन देण्याची भूमिका जैन समाज पार पाडत आहे. आपली मुले नोकरीच्या मागे न लागता ती उद्योग, व्यापारात आली पाहिजे. यावेळी जैन समाजातील उद्योजकांनी एकत्र येऊ इंडस्ट्रीयल पार्क उभा करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

भालचंद्र पाटील म्हणाले, जैन सभा आरोग्य, संस्कार, शेती, उद्योग आणि शिक्षण या पंचसूत्रीवर आधारित काम करत आहे. यावेळी रावसाहेब पाटील, भाऊसाहेब नाईक, डॉ. अजित पाटील, उद्योजक शीतल थोटे, प्रा. एन. डी. पाटील आदींसह उद्योजक, महिला उपस्थित होत्या.जैन नेक्स्ट बिझनेस ॲपजैन नेक्स्ट बिझनेस ॲपद्वारे समाजातील नवउद्योजकांना उभारणी दिली जाणार आहे. तर बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. एखाद्याला उद्योग उभारयचा असेल तर इतर उद्योजक त्याला मार्गदर्शन करतील, तर बेरोजगार तरुणाला एखादा उद्योजक त्या युवकांच्या कौशल्याच्या आधारे त्याला नोकरी उपलब्ध करून देईल.

टॅग्स :Sangliसांगली