उपक्रमशील शिक्षक सुनील लांडगे यांचा रोटरीतर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST2021-03-28T04:24:20+5:302021-03-28T04:24:20+5:30

सांगलीत रोटरी क्लबतर्फे खटाव येथील शिक्षक सुनील लांडगे यांचा गौरव जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. ...

Entrepreneurial teacher Sunil Landage honored by Rotary | उपक्रमशील शिक्षक सुनील लांडगे यांचा रोटरीतर्फे गौरव

उपक्रमशील शिक्षक सुनील लांडगे यांचा रोटरीतर्फे गौरव

सांगलीत रोटरी क्लबतर्फे खटाव येथील शिक्षक सुनील लांडगे यांचा गौरव जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजेंद्र लंबे, धर्मेन्द्र खिलारे, नितीन शहा आदी उपस्थित होते.

सांगली : खटाव (ता. मिरज ) येथील प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुनील लांडगे यांना रोटरी क्लबतर्फे गौरविण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार झाला. यावेळी रोटरीचे राजेंद्र लंबे, धर्मेन्द्र खिलारे, संग्राम पाटील, नितीन शहा, नंदकुमार कोरे आदी उपस्थित होते.

लांडगे यांनी खटावसारख्या ग्रामीण भागातील शाळेत अनेक उपक्रम राबविले आहेत. पक्ष्यांसाठी अन्नपाणी, वर्गखोल्यांच्या बोलक्या भिंती, वृक्षारोपण, प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण हे त्यांचे उपक्रम चर्चेचे ठरले आहेत. याची दखल रोटरीने घेतली.

Web Title: Entrepreneurial teacher Sunil Landage honored by Rotary