उद्योजक रामप्रताप झंवर यांचे योगदान मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:50+5:302021-06-21T04:18:50+5:30

फोटो : आष्टा येथील लायनर्स व कस्तुरी फाउंड्रीमध्ये रामप्रताप झंवर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी झुंजारराव पाटील, नितीन झंवर ...

Entrepreneur Ram Pratap Zanwar's contribution is invaluable | उद्योजक रामप्रताप झंवर यांचे योगदान मोलाचे

उद्योजक रामप्रताप झंवर यांचे योगदान मोलाचे

फोटो : आष्टा येथील लायनर्स व कस्तुरी फाउंड्रीमध्ये रामप्रताप झंवर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी झुंजारराव पाटील, नितीन झंवर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा नगरीचे पुत्र ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांनी फाउंड्री उद्योगात जिद्द, चिकाटीच्या जोरावर दबदबा निर्माण केला. आष्टा शहराचा नावलौकिक वाढवला. शहराच्या सामाजिक सहकार व औद्योगिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी केले.

झंवर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामप्रताप झंवर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना आष्टा लायनर्स व कस्तुरी फाउंड्री प्रा. लि. आष्टा येथे झंवर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन व श्रद्धांजलीप्रसंगी ते बोलत होते.

संचालक नितीन झंवर, आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, नगराध्यक्षा स्नेहा माळी, विरोधी पक्षनेते वीर कुदळे, अंकुश मदने, शैलेश सावंत, पोपट भानुसे, अमोल देशिंगे, सुनील घाटगे, दिनेश जाधव, सुयोग पाटील, विनायक तावदर, संकेत देसाई, सचिन सांभारे, सुधीर पाटील, संभाजी सावंत, सद्दाम मुजावर, इसामुद्दीन मुल्ला, सुनील सांभारे, वैभव ताम्हणकर, समीर गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट

तरुणांना रोजगार

आष्टा-इस्लामपूर मार्गावर पूर्वी पावरलूम होते. ते बंद झाल्यानंतर आष्टा शहरातील मान्यवरांनी उद्योगपती रामप्रताप झंवर यांना विनंती केल्यानंतर त्यांनी आष्टा लायनर्स कंपनी सुरू केली. या ठिकाणी फाउंड्री उद्योग भरभराटीला आला. त्यानंतर कस्तुरी फाउंड्री सुरू केली. आष्टा येथील हजारो युवकांना रोजगार मिळाला. मागील काही महिन्यांत रामप्रताप झंवर प्रत्येक सोमवारी आष्टा येथे भेट देत.

Web Title: Entrepreneur Ram Pratap Zanwar's contribution is invaluable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.