भिलवडी परिसरात रक्तदात्यांचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:43+5:302021-07-14T04:31:43+5:30
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे ‘लोकमत’ व बाबासाहेब चितळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ...

भिलवडी परिसरात रक्तदात्यांचा उत्साह
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे ‘लोकमत’ व बाबासाहेब चितळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्राम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ६२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील या शिबिरास भेट दिली. ते म्हणाले की, लोकमत परिवार नेहमीच समाजाला उपयोगी पडणारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते. ‘रक्ताचं नातं’ या उपक्रमातून राज्यातील रक्त टंचाईवर मात करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
यावेळी भिलवडी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे, संचालक गिरीश चितळे, जे. बी. चौगुले, भू. ना. मगदूम, डॉ. सुनील वाळवेकर, संजय कदम, भिलवडीच्या सरपंच सौ. सविता महिंद-पाटील, संजय कुलकर्णी, शहाजी गुरव, रमेश पाटील, डी. आर. कदम, राजेंद्र कुलकर्णी, प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे, डॉ. एस. बी. चव्हाण, डॉ. महेश पाटील, डॉ. विजय गाडे, दिग्विजय मोकाशी, आदी उपस्थित होते.
यांनी केले रक्तदान
सुशांत किरणगी, विश्वास यादव, श्रीपती खोत, डॉ. श्रीकांत चव्हाण, राहुल वाळवेकर, सुमेध कुलकर्णी, साहिल तापेकरी, अमोल वंडे, दत्तात्रय जोशी, संभाजी साळुंखे, विजय वावरे, अतुल काळे, संजय तावदर, सतीश मद्वाण्णा, विजय माने, तानाजी काळे, ऋषिकेश साळुंखे, सुशीलकुमार मगदूम, हरिश्चंद्र इंगळे, धनाजी गलांडे, चंद्रकांत पाटील, जितेश गाडे, सुहास करांडे, प्रशांत मोटकट्टे, समृद्धी पाटील, सुनील परीट, आनंदा उतळे, अभिषेक पाटील, प्रसाद साळुंखे, ऋत्विक पाटील, बी. एन. शिकलगार, गणेश फिरमे, विवेक काटीकर, सुहास गुरव, प्रज्वल गुरव, सागर कोळी, सूरज यादव, प्रथमेश सूर्यवंशी, अभिषेक खैरमोडे, अवधूत चव्हाण, विनय नकाते, शिवराज मोहिते, विश्वजित कोळी, संतोष हिरुगडे, सौरभ हिरुगडे, शरद जाधव, डॉ. महावीर चोपडे, प्रशांत धोतरे, प्रदीप पाटील, धनंजय साळुंखे, श्रीपाद जोशी, अरुण गुरव, जमीर सनदी, धनाजी यादव, सूरज शेख, चैतन्य करंबेळकर, कुलदीप ताम्हणकर, विजयकुमार ऐनापुरे, रोहित मस्के, अथर्व मोकाशी, आदित्य मोकशी, बाळासाहेब माने.
120721\img_20210712_110351.jpg
भिलवडी ता.पलूस येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी विश्वास चितळे,संग्राम पाटील,गिरीश चितळे,डॉ.बाळासाहेब चोपडे,जे.बी.चौगुले,डॉ.दिपक देशपांडे आदी.