दिघंचीत वडार समाजाच्या जागेवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:48+5:302021-06-10T04:18:48+5:30
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील वडार समाजातील लोकांसाठी असलेली जागा वडार समाजातील व्यक्तींनीच विकली आहे. या जागेवर काहींनी ...

दिघंचीत वडार समाजाच्या जागेवर अतिक्रमण
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील वडार समाजातील लोकांसाठी असलेली जागा वडार समाजातील व्यक्तींनीच विकली आहे. या जागेवर काहींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेने तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे केली आहे.
दिघंची हायस्कूलच्या पाठीमागे गायरान जागेवर ६० ते ७० वर्षांपासून वडार समाज वास्तव्यास असून, भाऊसाहेब हिराप्पा पवार व हणमंत बंडू पवार यांच्या नावे ८ अ चा उतारा निघत असून, हे लोक अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांना कोणतीही सूचना न देता शासनाची गायरान जागा विकता येत नसतानाही अरुण आत्माराम नाईक व राजेश मोहन पवार यांनी खोटी कागदपत्रे तयार करून विकली आहेत.
या जागेवर कलाप्पा कुटे व अंकुश ढोले यांनी अतिक्रमण करून पत्र्याचे शेड मारण्यासाठी साहित्य आणून टाकले आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाटेगावकर, हणमंत पवार, मिथुन पवार, सुरज पवार, धीरज पवार उपस्थित होते.
फोटो : दिघंची (ता. आटपाडी) येथील वडार समाजाच्या अतिक्रमण केलेल्या गायरान जागेबाबत तहसीलदार सचिन मुळीक यांना निवेदन देताना वडार समाजबांधव.