‘एक गाव, एक गणपती’साठी प्रोत्साहन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:14+5:302021-09-04T04:31:14+5:30

संख : श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य जत तालुक्यात यंदाही ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविणाऱ्या मंडळाला ‘श्री’ची ...

Encouragement for ‘One Village, One Ganpati’ | ‘एक गाव, एक गणपती’साठी प्रोत्साहन देणार

‘एक गाव, एक गणपती’साठी प्रोत्साहन देणार

संख : श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य जत तालुक्यात यंदाही ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविणाऱ्या मंडळाला ‘श्री’ची मूर्ती, वृक्षारोपणासाठी रोप, २०० मास्क, सॅनिटायझरचे वाटप करणार आहे. यासाठी मंडळांनी सहा सप्टेंबरपर्यंत संपर्क साधावा. असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे तुकारामबाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, ज्या गावात शासकीय नियमांचे पालन करत ‘एक गाव एक गणपती’ बसविण्यात येणार आहे, त्या गावाला श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. भविष्यात प्रदूषण कमी करुन पर्यावरण रक्षण करणे हा या उमक्रमा मागचा उद्देश आहे. ‘श्री’च्या मूर्तीसाठी मानव मित्र संघटनेच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तुकारामबाबा महाराज यांनी केले आहे. यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, रुपेश पिसाळ, विवेक टेंगले, समीर अपराध, सलीम अपराध, बंडा भोसले उपस्थित होते.

Web Title: Encouragement for ‘One Village, One Ganpati’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.