लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भारतीय जनता युवा मोर्चा सांगली व कोल्हापूर शहर जिल्हा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आणीबाणीचा घात....घात लोकशाहीचा’ हा ऑनलाइन संवाद कार्यक्रम शनिवारी पार पडला. आमदार संजय केळकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
आणीबाणीच्या काळात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्यात आली. आणीबाणीच्या लढायांतील सहभागी झालेल्या व्यक्तींचा सत्कार आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, दीपक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. स्वागत श्रीकांत शिंदे, प्रास्ताविक महेश जाधव व भाजपा कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे, सूत्रसंचालन किरण भोसले यांनी केले, तर आभार प्रथमेश वैद्य यांनी मानले. यावेळी दीपक माने, सुदर्शन पाटस्कर, प्रवीण फौंडे आदी उपस्थित होते.