प्रतीक पाटील यांचे विधान वैफल्यातून

By Admin | Updated: April 3, 2015 00:38 IST2015-04-02T23:57:00+5:302015-04-03T00:38:05+5:30

संजय पाटील : पाणी योजनांमध्ये राजकारण आणणे चुकीचे

Emblem Patil's statement is frustrated | प्रतीक पाटील यांचे विधान वैफल्यातून

प्रतीक पाटील यांचे विधान वैफल्यातून

सांगली : जिल्ह्यातील सिंचन योजनांबाबत प्रतीक पाटील यांनी वैफल्यातून विधान केलेले आहे. पाणी योजनांमध्ये राजकारण आणणे चुकीचे आहे. सरकार बदलले म्हणून भूमिका बदलल्या, असा अपप्रचार करण्यापेक्षा लोकांच्या हितासाठी एकत्र येण्याची भूमिका राजकारण्यांनी घेतली पाहिजे, असे मत खासदार संजय पाटील यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, आघाडी सरकार असताना आवर्तने सुरळीत होती आणि नव्या सरकारमुळे अडचणी आल्याची दिशाभूल करणारी वक्तव्ये आणि सोशल मीडियावरील अपप्रचार दुर्दैवी आहे. टंचाई काळात वीजबिल टंचाई निधीतून भरण्यात आले. वास्तविक त्यावेळची पाणीपट्टी अजूनही माफ झालेली नाही. आज ना उद्या ती आपल्याला भरावीच लागणार आहे. टंचाई नसताना योजनेचे वीजबिल कोठून भरायचे?, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. ही दीर्घकालीन शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना असल्याने ती व्यवस्थित चालावी, अशी अपेक्षा आहे. काही लोक या योजनांमध्ये राजकारण आणत आहेत. अशाप्रकारच्या राजकारणातून लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग सुरू आहे. लोकांनी राजकारणाकडे लक्ष न देता स्वत:चे हित पाहावे. पाण्याचे आवर्तन, त्याचा वापर, पाणीपट्टी भरण्याची पद्धत, त्याचे दर याबाबत एक शिस्त लागली पाहिजे. ही शिस्त लागली नाही, तर भविष्यात योजना चालवायच्या कशा?, याबाबतचे आर्थिक संकट आपल्यासमोर उभे राहील. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज केले पाहिजेत. सिंचन योजना पूर्णत्वास येत असताना, केवळ पाण्याच्या मागणीचे अर्ज नाहीत म्हणून अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आम्ही लोकांमध्ये जागृती करीत आहोत. (प्रतिनिधी)


दखल घ्यायची गरज नाही
प्रतीक पाटील यांनी, नव्या सरकारच्या कालावधित जिल्ह्यातील सिंचन योजनांचे भवितव्य अंधारात आहे, अशी टीका केली होती. या वक्तव्याची दखल घ्यायची गरज नाही, असे सांगतानाच संजय पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. पाणी योजनांबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित यावे, असे आवाहन त्यांनी केले.
दोषींवर कारवाई करा
जिल्हा बँकेबाबत भूमिका व्यक्त करताना ते म्हणाले की, बँकेतील गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. जिल्ह्यातील ८0 टक्के शेतकऱ्यांना या बँकेवर अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांची ही बँक चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे. त्यात राजकारण आणू नये.



स्वप्नील पाटील भाजपचा नव्हे
तासगाव-कवठेमहांकाळ पोटनिवडणुकीबाबत संजय पाटील म्हणाले की, स्वप्नील पाटील यांचे वडील पूर्वी आर. आर. पाटील यांच्याबरोबर काम करीत होते. त्यानंतर काही काळ त्यांनी काँग्रेसचे काम केले. केवळ लोकसभेच्या कालावधित स्वप्नील पाटील माझ्या प्रचारात होता. त्याचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आम्ही कोणतेही राजकारण केलेले नाही. नाराजीतून काही लोकांनी उमेदवारी अर्ज भरले असतील, तर त्यांना आम्ही समजावून सांगू. पक्षाने जी भूमिका घेतली आहे, त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. अजितराव घोरपडे यांचाही स्वप्नीलशी संबंध नाही. त्यामुळे विनाकारण कोणत्याही गोष्टीवर तर्क काढणे चुकीचे आहे. आम्ही आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनतार्इंनाच पाठिंबा दिलेला आहे.

Web Title: Emblem Patil's statement is frustrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.