शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेच्या पलूस शाखेत अडीच लाखांचा अपहार, तत्कालीन शाखाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 12:31 IST

पलूस : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील औद्योगिक वसाहत शाखेत दोन लाख ५२ हजार ४३३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखाधिकारी ...

पलूस : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील औद्योगिक वसाहत शाखेत दोन लाख ५२ हजार ४३३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखाधिकारी बाळासाहेब नारायण सावंत (रा. शिरटे, सध्या रा. इस्लामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बँकेचे लेखापाल विक्रांत लाड यांनी याबाबत पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.संशयित आरोपी बाळासाहेब सावंत हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पलूस शाखेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. एक ऑगस्ट २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत बँकेतील खातेदारांच्या खात्यावरील २ लाख २५ हजार ३६३ रुपये स्वत:च्या व इतर खात्यांवर वर्ग केले. तसेच वीज बिल ग्राहकांकडून आणि सोने तारण कर्जदारांनी जमा केलेले २७ हजार ७० रुपयांची रक्कम स्वत:कडेच ठेवली. एकूण २ लाख ५२ हजार ४३३ रुपयांचा अपहार शाखाधिकारी सावंत यांनी केला. बँकेच्या लेखापरीक्षणात ही गंभीर बाब पुढे आली आहे. या अपहारप्रकरणी लेखापाल लाड यांना संशयित शाखाधिकारी सावंत यांच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकारी यांनी दिले. त्यानुसार लाड यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावंत यांच्याविरुद्ध बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी