तुपारी येथे ८९ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:31 IST2021-08-24T04:31:22+5:302021-08-24T04:31:22+5:30
इस्लामपूर : तुपारी (ता. पलूस) येथे घरगुती वापराच्या वीज मीटरमध्ये फेरफार करून ८९ हजार रुपयांच्या विजेची चोरी केल्याची ...

तुपारी येथे ८९ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस
इस्लामपूर : तुपारी (ता. पलूस) येथे घरगुती वापराच्या वीज मीटरमध्ये फेरफार करून ८९ हजार रुपयांच्या विजेची चोरी केल्याची घटना उघडकीस आली. महावितरणच्या सांगली येथील भरारी पथकाने छापा मारून ही कारवाई केली.
सांगली येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेश श्रीरंग राऊत यांनी याविषयी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश वसंत पाटील (रा. तुपारी) यांच्याविरुद्ध विद्युत कायदा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राऊत यांच्या पथकाने मार्च २०२१मध्ये पाटील यांच्या घरी छापा टाकत त्यांच्या वीज मीटरची तपासणी केली होती. त्यावेळी मीटरचे सील फाटल्याचे दिसून आले. तसेच या मीटरमध्ये फेरफार केल्याने मीटरचा वेग ६५ टक्के इतका कमी दाखवत असल्याचे निदर्शनास आले. वीजचोरीचा हा कालावधी दोन वर्षे इतका गृहित धरून पाटील यांना वीज चोरीपोटी ८८ हजार ६२४ रुपये आणि तडजोड रक्कम म्हणून १२ हजार रुपये भरण्याची मुभा दिली होती. मात्र, त्यांनी ही रक्कम न भरल्याने राऊत यांनी महेश पाटील यांच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली.