जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी १०७ कोटी भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:10+5:302021-04-11T04:26:10+5:30
सांगली : गेल्या दोन महिन्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सांगली जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार ४२५ ग्राहकांनी १०७ ...

जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी १०७ कोटी भरले
सांगली : गेल्या दोन महिन्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सांगली जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार ४२५ ग्राहकांनी १०७ कोटी ७२ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. विशेष म्हणजे मांगले (ता. शिराळा) शाखा कार्यालयाने कार्यक्षेत्रातील मांगलेसह सात गावांनी गेल्या दोन महिन्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीच्या वीज बिलांचा १०० टक्के भरणा करून थकबाकीमुक्तीचा मान मिळविला आहे.
कोरोनामुळे सुरु केलेल्या लॉकडाऊनचा सर्वसामान्यांप्रमाणेच महावितरण कंपनीलाही फटका बसला आहे. थकबाकी वसुलीची महावितरणने विशेष मोहीम राबविली आहे. यामुळे दोन लाख ३४ हजार ४२५ ग्राहकांनी मार्चअखेरपर्यंत १०७ कोटी ७२ लाख रुपये भरले आहेत. शिराळा तालुक्यातील मांगले महावितरणच्या शाखा कार्यालयातील मांगले, देववाडी, लादेवाडी, फकीरवाडी, चिखलवाडी, चिमटेवाडी व पवारवाडी या सात गावांनी शंभर टक्के वीज बिलाचा भरणा करुन थकबाकीमुक्तीचा मान त्यांनी मिळविला आहे. मात्र अद्यापही मार्चअखेर सांगली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक दोन लाख, दोन हजार ३२६ ग्राहकांकडे ८५ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांची वसुलीची मोहीम कडक केली होती, तोपर्यंत पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढला आहे. तसेच लॉकडाऊनही सुरू झाल्यामुळे महावितरणच्या थकबाकी वसुलीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.