पत्र्याच्या शेडचे वीज बिल ९५ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST2021-01-03T04:28:23+5:302021-01-03T04:28:23+5:30

कोरोना काळात महावितरण कंपनीकडून वीज बिलांमध्ये भरमसाट वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये अजूनही नाराजी आहे. त्यातच आता सांगलीमध्ये बिलाचा अजब प्रकार ...

Electricity bill for leaf shed is 95 thousand | पत्र्याच्या शेडचे वीज बिल ९५ हजार

पत्र्याच्या शेडचे वीज बिल ९५ हजार

कोरोना काळात महावितरण कंपनीकडून वीज बिलांमध्ये भरमसाट वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये अजूनही नाराजी आहे. त्यातच आता सांगलीमध्ये बिलाचा अजब प्रकार समोर आला आहे. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल ९५ हजारांचे बिल पाठवण्यात आले आहे. रघुनाथ वाळखंडे असे या व्यक्तीचे नाव आहे. रघुनाथ यांनी शहरातील रामनगर परिसरात पत्र्याची खोली भाड्याने घेतली असून, ते तिथेच राहतात. ते ४०० रुपये मजुरीवर वीटभट्टीवर कामावर जातात. मात्र, या एका खोलीचे वीज बिल ९५ हजार रुपये आल्याने आता हे भरायचे कसे असा प्रश्न या गरीब मजुराला पडला आहे.

एका दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या कुटुंबासमवेत वाळखंडे राहतात. त्यांच्या या खोलीमध्ये केवळ एक बल्ब आणि टीव्ही आहे. मात्र, त्यांना वीज वितरण कंपनीकडून लाखाच्या घरातले बिल पाठवण्यात आले आहे. या बिलासंदर्भात त्यांनी अनेकवेळा महावितरण कार्यालयात चकरा मारल्या. मात्र, प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आता या बिलाचे काय करायचे, असा प्रश्न या मजुराला पडला आहे.

यापूर्वीही प्रकार

सांगलीत वीज बिलांचे अजब प्रकार यापूर्वीही घडले आहेत. कधी शून्य बिल, तर कधी लाखोंची उड्डाणे महावितरणने दाखवून दिली. दुरुस्ती होत असली तर वारंवार अशा घटना घडत असल्याने महावितरणच्या बिल आकारणीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

Web Title: Electricity bill for leaf shed is 95 thousand