राष्ट्रवादीकडून विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST2020-12-29T04:25:40+5:302020-12-29T04:25:40+5:30

राष्ट्रवादीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना कमलाकर पाटील यांच्या हस्ते निवडीची पत्रे देण्यात आली. यावेळी छाया जाधव, आशा पाटील, सुमोघ पाटील उपस्थित ...

Elections of various office bearers from NCP | राष्ट्रवादीकडून विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी

राष्ट्रवादीकडून विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी

राष्ट्रवादीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना कमलाकर पाटील यांच्या हस्ते निवडीची पत्रे देण्यात आली. यावेळी छाया जाधव, आशा पाटील, सुमोघ पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली विधानसभा क्षेत्राच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी सोमवारी जाहीर करण्यात आल्या. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात या निवडी पार पडल्या. विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची पत्रे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. यामध्ये अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी समीर करीम, दिव्यांग सेलच्या अध्यक्षपदी जगू शेख, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी दयानंद कोलप यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी कमलाकर पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे, असे आवाहन केले. यावेळी विधानसभा क्षेत्राच्या महिला अध्यक्षा डॉ. छाया जाधव. दिव्यांग सेल शहर जिल्हाध्यक्षा आशा पाटील, पूजा कोलप, सुमोघ पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Elections of various office bearers from NCP