काँग्रेसमधील विविध सेलच्या निवडी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST2021-01-18T04:23:33+5:302021-01-18T04:23:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी रविवारी जाहीर करण्यात आल्या. शहर जिल्हाध्यक्ष ...

काँग्रेसमधील विविध सेलच्या निवडी जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी रविवारी जाहीर करण्यात आल्या. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महानगरपालिका क्षेत्रासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग सेलचे अध्यक्ष म्हणून याकूब हारुण मणेर यांची तर स्वातंत्र्यसैनिक सेलचे अध्यक्ष म्हणून रघुनाथ बाळकृष्ण नार्वेकर यांची निवड करण्यात आली. सुरुवातीला आम आदमी पार्टीचे याकूब मणेर तसेच रेश्मा थोरात, दीपक बनसोडे, परवेज नगारजी, किरण कांबळे, सचिन पोटे (सांगलीवाडी) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाने मोठे योगदान दिले आहे. देशासाठी बलिदान देणारा हा पक्ष आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांचा हा पक्ष आहे. सर्वसामान्य माणसाला हाच पक्ष न्याय देऊ शकतो, या पक्षाचे बळ सध्या चांगल्या पद्धतीने वाढत आहे.
प्रास्ताविक पैगंबर शेख यांनी केले तर बिपिन कदम यांनी आभार मानले. यावेळी विजय आवळे, मौलाली वंटमुरे, पैगंबर शेख, माणिक कोलप, राजेंद्र कांबळे, नामदेव पठाडे, जावेद मुल्ला, प्रशांत अहिवळे, प्रफुल्ल थोरात, अल्पेश बनसोडे, सादिक मुजावर, शिवाजी कोळी, सुरज रजपूत आदी उपस्थित होते.