शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

निवडणुकीपूर्वी पक्षांतराचा मिरज पॅटर्न कायम : मिरज महापालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:22 IST

मिरजेतील काँग्रेस व राष्टÑवादीच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिका निवडणूकीपूर्वी पक्षांतराचा मिरज पॅटर्न कायम राहिला आहे.

ठळक मुद्दे भ्रष्टाचाराबाबत भाजपच्या तोंडाला बसणार कुलूप, सत्ताधारी गटाला धक्का देण्याची परंपरा

सदानंद औंधे ।मिरज : मिरजेतील काँग्रेस व राष्टवादीच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिका निवडणूकीपूर्वी पक्षांतराचा मिरज पॅटर्न कायम राहिला आहे. सत्ताधारी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे महापालिकेतील घोटाळे व भ्रष्टाचाराबाबत भाजप नेत्यांची बोलती बंद होणार आहे. मिरजेतील कारभारी नगरसेवकांनी महापालिकेतील सत्ताधारी नेत्यांना नेहमीच धोबीपछाड दिली असल्याने, या नगरसेवकांना नियंत्रणात ठेवण्याची कसरत भाजप नेत्यांना करावी लागणार आहे.

गत महापालिका निवडणुकीत मिरजेतील २४ पैकी १४ जागा इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी या मिरजेतील कारभारी नेत्यांच्या मदतीने काँग्रेसने जिंकल्या होत्या. मिरजेत यश मिळाल्याने महापालिकेची सत्ता काँग्रेसला हस्तगत करणे शक्य झाले. मात्र सध्याच्या महापालिका निवडणुकीपूर्वी मिरजेतील कारभारी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. सुरेश आवटी, विवेक कांबळे, शिवाजी दुर्वे, निरंजन आवटी या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक महादेव कुरणे यांच्यासह राष्टÑवादीचे माजी नगरसेवक आनंदा देवमाने, मनसेचे दिगंबर जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मिरजेत किशोर जामदार, संजय मेंढे, बबीता मेंढे, बसवेश्वर सातपुते, धोंडुबाई कलगुटगी, बेबीताई मालगावे एवढेच काँग्रेसमध्ये निष्ठावंत नगरसेवक शिल्लक राहिले आहेत.

महापालिका निवडणुकीपूर्वी इद्रिस नायकवडी यांच्या संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र आलेले नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने, संघर्ष समितीही भाजपशी तडजोड करण्याची शक्यता आहे. गत निवडणुकीत मिरजेत भाजपचा केवळ एक उमेदवार निवडून आला होता. मात्र यावेळी काँग्रेसचे चार, तसेच मनसे व राष्टÑवादीचा एक असे सहा आजी-माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. भाजपने नगरसेवकांची पळवापळवी केल्याने महापालिका निवडणुकीत मिरजेत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी भाजपने मिरजेतील आजी-माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला असला तरी, महापालिकेत सत्ता मिळाली नाही, तर ही मंडळी भाजपमध्ये राहणार का, याबाबत साशंकता आहे. आ. सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर पाचशे कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून, मुख्यमंत्र्यांकडे याच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र महापालिकेतील कारभारी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशानंतर महापालिकेतील घोटाळे व भ्रष्टाचाराबाबत भाजप नेत्यांना मौन पाळावे लागणार आहे.

भाजपमधील निष्ठावंतांना डावलून आयात मंडळींना उमेदवारी देण्याच्या खेळीला काँग्रेस, राष्टÑवादी कितपत आणि कसे तोंड देणार, यावरच निवडणूक समीकरणे अवलंबून आहेत. प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलणाºया नगरसेवकांच्या मिरज पॅटर्नचा फटका यापूर्वी काँग्रेस व महाआघाडीला बसला असल्याने, भाजप नेत्यांना सतर्क रहावे लागणार आहे.खाडेंचे गणित : विधानसभेसाठीआ. सुरेश खाडे महापालिकेच्या कारभारापासून अलिप्त असले तरी, मिरजेतील नगरसेवकांशी त्यांची वर्षभर सलगी सुरू होती. महापालिका निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुकीचे गणित असल्याने, आ. खाडे यांनी आजी-माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशासाठी पुढाकार घेतला. निष्ठावंत-जुनी मंडळी हे स्वीकारणार का, हा प्रश्न आहे. 

हे विसरणार का?मिरज दंगलप्रसंगी सुरेश आवटी यांना भाजप नेत्यांनी लक्ष्य केले होते. विवेक कांबळे यांनी काही महिन्यांपूर्वी कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि भाजपवर टीका करून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजप सरकारमधून बाहेर पडावे, अशी मागणी केली होती. हे सर्व विसरून आता त्यांना भाजप नेत्यांशी जमवून घ्यावे लागणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण