महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी सुनीता देशमाने यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:52+5:302021-09-02T04:56:52+5:30
ओळ : राजारामनगर येथे राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास महिला राष्ट्रवादीच्या नूतन तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने यांनी अभिवादन केले. यावेळी ...

महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी सुनीता देशमाने यांची निवड
ओळ : राजारामनगर येथे राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास महिला राष्ट्रवादीच्या नूतन तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने यांनी अभिवादन केले. यावेळी विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, छाया पाटील, मेघा पाटील उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुनीता संतोष देशमाने (पेठ) यांची तालुकाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील व महिला राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक छाया पाटील यांच्या हस्ते देशमाने यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, संजय पाटील, मेघा पाटील, सुवर्णा जाधव, पेठ येथील विजय पाटील, माजी सरपंच हेमंत पाटील, शरद पाटील उपस्थित होते.
सुनीता देशमाने म्हणाल्या, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मला तालुकाध्यक्षा म्हणून संधी दिली आहे. मी तालुक्यात महिलांचे मजबूत संघटन करून त्यांचा विश्वास सार्थ करेन.
विजयराव पाटील म्हणाले, सुनीता देशमाने यांनी पेठच्या सरपंच, राजारामबापू दूध संघाच्या संचालिका म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. तालुकाध्यक्षा म्हणूनही त्या प्रभावी काम करतील.
जिल्हाध्यक्षा जाधव म्हणाल्या, तालुक्यात महिलांचे प्रभावी टीम वर्क आहे. राज्यात आदर्शवत महिला संघटनेची परंपरा पुढे न्यावी. यावेळी छाया पाटील, संजय पाटील, सुवर्णा जाधव, विजयराव पाटील (पेठ), अलका शहा, खजिनदार नयना पाटील यांनीही त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
संचालिका मेघा पाटील यांनी स्वागत केले. यावेळी महिला राष्ट्रवादीच्या मंजूषा पाटील, रंजना पाटील, स्वाती कदम, सरिता पाटील, चारुलता पाटील, विद्या भानुसे, प्रा. अनिल पाटील, पेठचे सुनील तवटे, शिवाजी खापे, भागवत पाटील, शिवराज पाटील, अशोक माळी, संतोष देशमाने, माणिक देशमाने, अमर देशमाने, विजय चव्हाण, रविकिरण बेडके, विद्या शेटे, मंदाताई माळी, वैशाली देशमाने, मनीषा धोत्रे, मधुकर पाटील, डॉ. सुभाष भांबुरे, शहाजी पवार उपस्थित होते. पेठचे माजी उपसरपंच राहुल पाटील यांनी आभार मानले.