जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची १० फेब्रुवारीपर्यंत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:43+5:302021-02-05T07:31:43+5:30
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. यावरूनही राज्यात काही प्रश्न उपस्थित झाले. सरपंच पदासाठी अखेर शनिवारी जिल्ह्यातील ...

जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची १० फेब्रुवारीपर्यंत निवड
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. यावरूनही राज्यात काही प्रश्न उपस्थित झाले. सरपंच पदासाठी अखेर शनिवारी जिल्ह्यातील सर्व गावांसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर सरपंच पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण शनिवारी जाहीर झाले. नुकत्याच झालेल्या १५२ ग्रामपंचायतींसह दुसऱ्या तसेच पुढील टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सरपंच निवडीच्या तारखांकडे लक्ष होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबत लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. ६९९ ग्रामपंचायतींपैकी २०९ ग्रामपंचायतींसाठी सरपंचद खुले झाले आहे. खुल्या प्रवर्गातील ४२३ गावांपैकी २१४ गावांत महिला सरपंच असतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील १८९ ग्रामपंचायतींपैकी ९८ गावांत महिला सरपंच असणार आहेत. अनुसूचित जातीच्या ८३ ग्रामपंचायतींपैकी ४४ गावांत महिला सरपंच असणार आहेत, तर अनुसूचित जमातीच्या चार पैकी दोन गावांत महिला सरपंच असणार आहेत.