मिरजेत उपसभापतीची १७ फेब्रुवारीला निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:25+5:302021-02-10T04:26:25+5:30
दिलीपकुमार पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. १७ फेब्रुवारीरोजी निवड होणार आहे. ...

मिरजेत उपसभापतीची १७ फेब्रुवारीला निवड
दिलीपकुमार पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. १७ फेब्रुवारीरोजी निवड होणार आहे. भाजपकडून टाकळीचे सदस्य किरण बंडगर यांना संधी देण्याचे निश्चित झाले आहे. चार महिन्यानंतर उर्वरित कालावधी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांना देण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी सभापती निवडीवेळी घेतला होता. मात्र तत्पूर्वी
विरोधी काँग्रेसच्या गोटात उपसभापतीची निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पंचायत समितीत सध्या सदस्य संख्या २१ आहे. यामध्ये भाजपकडे दोन अपक्ष सहयोगी सदस्यासह १२, काँग्रेसकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका सहयोगी सदस्यासह ८, राष्ट्रवादी १ असे बलाबल आहे. बहुमत असल्याने उपसभापती भाजपचा होणार असे चित्र असले तरी काँग्रेसने निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. भाजपचे काही सदस्य निवड बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी नाराजी मिटविण्यात ते कितपत यशस्वी होतात यावर सगळे अवलंबून आहे.
चौकट
ग्रामपंचायत निवडणुकीचे पडसाद
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपमध्ये फूट पडली. अनेक गावांत पक्षांतर्गत दोन गट एकमेकांविरोधात लढले. भाजप नेत्यांनी एकोप्यासाठी प्रयत्न केले नाहीत अथवा राजकीय पाठबळ देण्यात दुजाभाव केल्याच्या भावनेतून एक गट नाराज आहे. तो पंचायत समितीच्या राजकारणाशी निगडीत असल्याने नाराजीचे पडसाद उपसभापती निवडीवर उमटण्याची शक्यता आहे.