कृष्णा कारखान्याची निवडणूक पुढे ढकलावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST2021-05-17T04:25:08+5:302021-05-17T04:25:08+5:30
इस्लामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील पुरोगामी समविचारी पक्ष संघटना एकत्र आली ...

कृष्णा कारखान्याची निवडणूक पुढे ढकलावी
इस्लामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील पुरोगामी समविचारी पक्ष संघटना एकत्र आली आहे. या संघटनेनी दि. २६ रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी सातारा, सांगली जिल्ह्यातील पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पॅनल प्रमुख यांच्याकडे केली आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा व एकंदरीत परिस्थिती पाहता तसेच पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पंढरपूर पोट निवडणूक आणि गोकुळ दूध संघाची निवडणूक यांचा अनुभव पाहता कोरोना आपत्तीमध्ये निवडणूक घेणे चुकीचे, अन्यायकारक व क्रुरता पूर्ण ठरेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कृष्णेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. ही निवडणूक दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घातक ठरेल. एका बाजूला लोकशाही हक्क नाकारणारे निर्बंध, संचारबंदी, जिल्हाबंदी, सर्व प्रकारचे व्यवसाय बंदी, सर्व कार्यक्रमांना निर्बंध असताना ही निवडणूक घेणे अयोग्य असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. या निवेदनावर प्राचार्य विश्वास सायनाकर, शरद पाटील, अनिल पाटील, धनाजी गुरव, दीपक कोठावळे, प्रा. एल. डी. पाटील, भगवंतराव जाधव, सागर रणदिवे, जयकर पवार, दिग्विजय पाटील, विजय कुंभार, विशाल मदने आदींच्या सह्या आहेत.