शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

बिगुल वाजले, सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:24 IST

इच्छुकांकडून मोर्चेबांधणी : पाच नगरपालिका, तीन नगरपंचायतींचा समावेश

सांगली : जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, तासगाव, विटा, जत, आष्टा नगरपालिका आणि पलूस, शिराळा, आटपाडी नगरपंचायतीमधील आठ नगराध्यक्षांसह १८९ नगरसेवकांच्या जागांसाठी मंगळवारी राज्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केली. इच्छुकांनी लगेच प्रभागातील कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासह नेत्यांकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून झाल्या नाहीत. यामुळे सर्वच पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता. अखेर या नेत्यांचा विचार करून राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकाची घोषणा केली. नगरपालिका, नगरपंचायतीसाठी मंगळवारी सायंकाळपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.शहरातील राजकीय नेत्यांचे डिजिटल फलक हटविण्यास प्रशासनाने सुरुवात केली. दि. १० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून दि. १७ नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. १८ नोव्हेंबरला छाननी असून २५ नोव्हेंबर अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांनी प्रभागात मोर्चेबांधणी सुरू केली. महायुती, महाविकास आघाडीच्या निर्णयाकडेही सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. तीन वर्षांनंतर निवडणुका होत असल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, उद्धवसेना, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीतील विजयासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

नगरपंचायत, नगरपालिकांची नगरसेवक संख्यानगरपंचायत-नगरपालिका / नगरसेवक संख्या/ नगराध्यक्षउरुण-ईश्वरपूर / ३० / १तासगाव / २४ / १विटा /२६ / १जत / २३ / १आष्टा / २४ / १आटपाडी / १७ / १शिराळा / १७ / १पलूस / २० / १

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District Gears Up for Municipal Elections: 189 Seats at Stake

Web Summary : Sangli district's eight municipalities are set for elections. The election code of conduct is now in effect. Filing starts November 10th, voting December 2nd, and counting December 3rd. Parties strategize for victory.