वाळवा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:19+5:302021-07-16T04:19:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. अशोक खोत ...

Election of BJP office bearers in Valva taluka announced | वाळवा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

वाळवा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. अशोक खोत हे पुन्हा शहराध्यक्ष झाले. तर सतेज जयवंत पाटील यांच्याकडे युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. शहर महिला अध्यक्षा स्मिता पवार यांना संधी देण्यात आली. आष्टा शहराच्या अध्यक्षपदी उदय कवठेकर, युवा मोर्चासाठी आरबाज मुजावर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे, संजय हवालदार, डॉ. सतीश बापट यांच्या उपस्थितीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांना निवडीची प्रमाणपत्रे देण्यात आली.

निवडण्यात आलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे : विकास परीट, शरद कुंडले, फारूख इबुशे, मेहबूब चाऊस, प्रवीण परीट, भास्कर मोरे, अरूण शिंगण, मुकुंद रास्कर, अक्षय कोळेकर, वजीर डाके, तानाजी पाटील, रामभाऊ शेवाळे, रामभाऊ जाधव, स्वप्निल कोरे, अभिजीत खडके, पंकज ताटे, जवाद जमादार, जफर खाटीक, फिरोज मुंडे, अनिल सरदेशमुख, सूरज पाटील, निवास पाटील, शिवाजी माने, विजयमाला पाटील, श्रीदेवी आडमुठे, संदीप सावंत, शिरीष रसाळ, नीता कदम, दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात, रूपाली माने, गणेश हराळे, वसंत कदम, सागर फाळके, ज्ञानेश पाटील, मंगल जाधव, दीपाली हाके यांची नूतन कार्यकारिणी निवड केली आहे.

Web Title: Election of BJP office bearers in Valva taluka announced